खानावळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व शिवसंवाद,शिवकाळ प्रस्तुती कार्यक्रम
पनवेल (वैभव लबडे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खानावळे येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सव्यसाची संस्कार वर्ग खानावळे व ग्रामस्थ मंडळ खानावळे यांच्यावतीने गुरुवार,दिनांक १९ फेब्रुवारी रोजी हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवानिमित्त सकाळी ९.३० वाजता प्रतिमा पूजन, सांयकाळी ३.३० ते ५.३० शोभायात्रा भगवे ध्वज आणि शिवरायांच्या जयघोषात ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर ७.०० ते ७.३० प्रतिमा पूजन, प्रास्ताविक,
संध्यकाळी ७.३० ते ८.३० शिवकाळ प्रस्तुति (सव्यसाची संस्कार वर्ग), ८.३० ते ९.०० शिवसंवाद (व्याख्याते : संतोष सते, भाताण), रात्री ९.०० ते १०.०० : भोजन (शिवमहाप्रसाद) रात्री १०.०० ते ११.०० : भजन (जय मल्हार भजन मंडळ, खानावळे) असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post a Comment