News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शेजारी राहणार्‍या महिलेकडून घेतलेली सोन्याची गंठण परत न करता शेजारीण पसार ...पनवेलजवळील नेवाळी येथील घटना

शेजारी राहणार्‍या महिलेकडून घेतलेली सोन्याची गंठण परत न करता शेजारीण पसार ...पनवेलजवळील नेवाळी येथील घटना

पनवेल (वार्ताहर) ः माघी गणपतीला जाण्यासाठी शेजारी राहणार्‍या महिलेकडून घेतलेले सोन्याचे गंठण परत न करता ते घेऊन शेजारीण पसार झाल्याची घटना खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.याप्रकरणी पोलिसांनी गंठण घेऊन पसार झालेल्या शेजारणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेवाळी येथे राहणार्‍या उज्ज्वला गोटीराम पाटील यांच्या शेजारी शीतल काथारा नावाची महिला राहते.शीतल काथारा हिला चिंधरण येथे माघी गणपतीला जायचे होते. त्यामुळे तिने उज्ज्वला पाटील हिच्याकडे असलेले सोन्याचे गंठण घालण्यासाठी मागितले होते.त्यावर उज्ज्वला यांनी तिला हे गंठण दिले होते.दोन दिवसांनी उज्ज्वला या गंठण मागण्यासाठी शीतलच्या घरी गेले असता तिने गंठण घेऊन येते, असे त्यांना सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून त्या घरी परतल्या.मात्र,शीतल गंठण घेऊन आली नाही. त्यामुळे त्या काथारा हिच्या घरी गेले असता शीतल घरातून निघून गेल्याचे समजले. त्यावर उज्ज्वला यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment