News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिका निवडणूक ...मतदारांचा भरपूर प्रतिसाद -इकबाल काझी ...प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचार रॅली,मतदारांच्या गाठीभेटी

पनवेल महानगरपालिका निवडणूक ...मतदारांचा भरपूर प्रतिसाद -इकबाल काझी ...प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचार रॅली,मतदारांच्या गाठीभेटी

पनवेल -  पनवेल महानगरात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अनेक विकासाची कामे केलेली आहेत,या विकास कामांमुळेच आम्ही प्रचार करीत असताना आम्हाला नागरिकांचा,मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १४ चे भाजपचे उमेदवार इकबाल काझी यांनी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचार रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १४ मधील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार इकबाल हुसेन काझी,सतीश दत्ता पाटील,रेणुका मयुरेश नेतकर,सारिका अतुल भगत यांच्या प्रचारार्थ भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर व महायुतीचे माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या निवडणूक प्रचारार्थ इकबाल काजी हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. पनवेल शहरातील रस्ते,रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे,झोपडपट्ट्यांचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात झालेला आपणास दिसत आहे.त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे द्यावीत ही माझी मागणी आहे.
आतापर्यंत मी अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे.माझ्याकडे आलेला माणूस हा आपला माणूस आहे, कुठल्या जाती धर्माचा पाहिला नाही.त्यांना मदतच करत आलो आहे असल्याचे शेवटी इकबाल काझी यांनी बोलताना सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment