पनवेलमध्ये महाराष्ट्राची सौंदर्यवती फॅशन शो स्पर्धा संपन्न .....सिने अभिनेते अभिनेत्री,उद्योजिका,समाजसेविका,पत्रकार यांची उपस्थिती
पनवेल - पनवेलमध्ये महाराष्ट्राची सौंदर्यवती फॅशन शो स्पर्धा संपन्न झाली.या सोहळ्यास सिने अभिनेते अभिनेत्री,उद्योजिका,समाजसेविका,पत्रकार यांची उपस्थिती होती.पनवेल येथील सिंधी पंचायत हॉलमध्ये महाराष्ट्राची सौंदर्यवती फॅशन शो आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन साहस फौंडेशनचे अध्यक्षा रेश्मा कुरूप,झुलेलाल ट्रस्टचे ऍडव्होकेट मनोहर सचदेव,एक्टरेस सिद्धी कामत,रेश्मा भोईर व इतर मान्यवर ह्यांनी द्वीप प्रज्वल करून केले.ह्या ब्युटी पेजन्टचे वैशिष्ट्य म्हणजे हे ब्युटी पेजन्ट लहान मुलं मुली,मिसेस व मिस बरोबर स्पेशली एबल्ड चाईल्ड ह्यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता.अध्यक्ष रेश्मा कुरूप ह्यांनी माहिती दिली कि,सौंदर्य स्पर्धांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही एक संस्था म्हणून ह्या मुलांना सुद्धा सामान्य मुलांबरोबर व्यासपीठ देऊन त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केले आहेत.या कार्यक्रमामुळे त्यांना स्पर्धा करण्याची आणि त्यांची प्रतिभा आणि टॅलेंट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
एकूण 65 स्पर्धक ह्या स्पर्धामध्ये भाग घेतले होते.महाराष्ट्रची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद मानसी सुर्वे (50+ वयोगट ),महाराष्ट्रची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद सौ.हर्षला कारंडे, महाराष्ट्रची सौंदर्यवती मिसचे विजेतेपद पूजा भांडारकर व इतर स्पर्धकांना फॅशन आयकॉन,फोटोजेनिक फेस अशा वेग वेगळे टायटल्स देऊन स्पर्धकांना क्राऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला तसेच विजेत्या स्पर्धकांना मालाबार ज्वेलर्सकडून चांदीचे कॉइन व VLCC कडून गिफ्ट voucher देण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सिनेस्टार श्री.संजय खापरे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे कोमल व कोरिओग्राफी एक्टरेस स्वप्नाली केलजी व ऍक्टर देवदत्त घरात ह्यांनी केले तर विजेत्यांची निवड कामोठे येथील आदी मॅटर्निटी हॉस्पिटल व स्किन क्लिनिक चे डायरेक्टर Dr शीतल गोसावी,एक्टरेस अर्चना पवार व स्वाती सोनावणे ह्यांनी केले. त्याच बरोबर ह्या कार्यक्रमात मोहिनी विक्रांत पाटील,साई पलक डेव्हलपर्सचे प्रो.श्री भूषण अजित पोवळे,
महादेव घरत,उद्योजिका रेश्मा भोईर,उद्योजिका माधवी भोईर व मान्यवर उपस्थित होते व प्रीतम म्हात्रे ह्यांचा विशेष सहकार्य होता तसेस साहस फौंडेशनचे मेंबर अनघा गोळे, शीतल आंबेरकर,अनविका,अजिंक्य ह्याचे विशेष सहकार्य लाभले .ह्या अनोळखी व नाविण्य पूर्ण ब्युटी पेजन्ट कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल अध्यक्ष रेश्मा कुरूप व ऍडव्होकेट मनोहर सचदेव ह्यांचे सर्वत्र कौतुकाचे वर्षाव होत आहे.
Post a Comment