पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठी आरक्षण निश्चिती सोडतीचे उद्या आयोजन
पनवेल - पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठी आरक्षण निश्चिती सोडतीचे उद्या आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक:- मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
वेळ:- सकाळी ११.०० वाजता
स्थळ:- आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल
पनवेल महानगरपालिकेच्या *Panvel City Municipal Corporation* या फेसबुक पेजवरुन या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Post a Comment