वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या महिलांचा पनवेलच्या द्वारकादास शामकुमारतर्फे साडी देऊन सन्मान
पनवेल - बहिणींनो! चला आधी स्वतःचे संरक्षण करूया.. या उद्देशाने वाहतुकीचे काटेकोरपणे नियम पाळणाऱ्या महिलांना साडी देऊन पनवेलच्या द्वारकादास शामकुमार या साडी शोरूमच्यावतीने सन्मानित करण्यात आले,पनवेल शहरात झालेल्या या सामाजिक उपक्रमास महिलांना मिळालेल्या साडीच्या सरप्राईज भेटीने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यावेळी द्वारकादास शामकुमारचे संचालक शरद पाटील,माजी नगरसेविका नीता माळी,डॉ.सुरेखा मोहोकर,सारिका भगत,महिला पोलीस हवालदार किरण भाटकर,
महिला पोलीस शिपाई अंजना पवार,महिला पोलीस शिपाई अर्चना फडतरे,पोलीस हवालदार गोटू पवार उपस्थित होते.
द्वारकादास शामकुमार या साडी शोरूमतर्फे महाराष्ट्रभर ७० हून अधिक शाखांमधून हा उपक्रम राबविला जात आहे,यापूर्वीही विविध माध्यमातून प्रत्येक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत.द्वारकादास शामकुमार या साडीच्या शोरूमने आतापर्यंत सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेतला आहे यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील असे द्वारकादास शामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी सांगितले.
आपली गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन स्वतःचे रक्षण करण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल असून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर स्वतःची सुरक्षा निश्चित केली आणि त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी इतरांसाठी एक प्रेरणादायक आदर्श तुम्ही निर्माण केला आहे. या रक्षाबंधनाला स्वतःसाठी दिलेले हे वचन खरं रक्षणाचा प्रतीक ठरतं त्याचबरोबर शहर वाहतूक सुलभतेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण करीत असलेल्या कार्याला सलाम करत नागरिकांच्यावतीने द्वारकादास शामकुमारवतीने वाहतूक पोलिसांचे आभार मानले.या उपक्रमास पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
Post a Comment