वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने सूचना फलक ... परिसरात अंमली पदार्थ,मद्य,दारू,तत्सम मादक द्रव्य,पदार्थ बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास संबधिताविरूध्द कायदेशीर कारवाई होणार
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन हद्दीत असलेल्या विविध ठिकाणच्या नदी पात्रे ,धरणे,कुंडे आधी ठिकाणी सूचना फलक उभारण्यात आले आहेत.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत सूचना फलक उभारण्यात आले असून या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पर्यटनाचे ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेचे दृष्टीकोनातुन विविध सूचना देण्यात आल्या आहेत,त्यामध्ये पर्यटकांनी नदी पात्रात जाणे हे त्यांचे जिवीतास धोकादायक आहे,नदी पात्रामध्ये बर्याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजुन येत नाहीत.आपण आलेले परिसरात पाऊस नसला तरी,माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याचे प्रवाहामध्ये अचानक पणे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजून येत नसल्याने काही लोकांचा यापुर्वी सदर नदीपात्रात बुडून मृत्यु होवून बन्ऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.लहान मुले, स्त्रीया व ज्या लोकांना पोहता येत नाही. अशा लोकांनी पाण्यात उतरू नये.गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दुषित करू नये.सदर परिसरात अंमली पदार्थ, मद्य,दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे,सदर परिसरात अंमली पदार्थ,मद्य,दारू अथवा तत्सम मादक द्रव्य,पदार्थ बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास संबधिताविरूध्द प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरचा परिसर हा घनदाट झाडा-झुडपांचा व डोंगराळ असुन तेथील रस्ते अरूंद आहेत.त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने,अॅम्ब्युलन्स यांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला रहावा यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने रस्त्याचे कडेला,दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने उभी करू नयेत, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तन्हेने उभे करण्यात आलेले वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.सदर परिसरात मौज मजेसाठी व सहलीसाठी येणारे पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा तसेच नशा करून वाहन चालवु नये तसे आढळुन आल्यास संबधिताविरूध्द प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सदर परिसरातील वरीलप्रमाणे धोक्याचे अनुषंगाने जनतेच्या जिवीताची व सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेवुन सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाढेश्वर धरण,वारदोली धबधबा,मोर्बे धरण,कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा) हरिग्राम नदीपात्र,धोदाणी नदीपात्र,चिंध्रण व मोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र,माचीप्रबळ या ठिकाणी भेटी देण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे.
स्थानिक रहीवासी व सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क ९८१९६७९१०० तसेच डायल ११२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे .
स्थानिक रहीवासी व सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क ९८१९६७९१०० तसेच डायल ११२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे .
Post a Comment