पनवेलच्या श्री साई नारायण बाबा मंदिरात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन
पनवेल - श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट,पनवेल आणि श्री सत्य साई सेवा समिती,पनवेल व भारत विकास परिषद,पनवेल व इंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स
यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलच्या श्री साई नारायण बाबा मंदिरात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सर्वसाधारण तपासणी,त्वचा तपासणी,लहान मुलांची तपासणी, मधुमेह-रक्तदाब आदी आरोग्य तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या.या शिबिरास श्री साई नारायण बाबा आश्रमाचे सेक्रेटरी रामलाल चौधरी,कोऑर्डिनेटर राम थदानी भेट देऊन आरोग्य शिबिरास शुभेच्छा दिल्या. या शिबिराचा शालेय विद्यार्थ्यांसहित जेष्ठ नागरिक,महिला,नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले.
Post a Comment