वारंवार अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या हातगाड्यांवर पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब ची तोडक कारवाई
पनवेल,दि.10 : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ता अडवून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कळंबोली परिसरातील हातगाड्यांवरती आज अतिक्रमण विरोधी पथकाच्यावतीने तोडक कारवाई राबविण्यात आली.
वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या 5 हातगाड्यांवर प्रभाग अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती 'ब' अंतर्गत या तोडक कारवाई करण्यात आली.यावेळी प्रभाग समिती 'ब' चे प्रभारी अधीक्षक मनोज चव्हाण,अतिक्रमण विरोधी पथक व प्रभागाचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
झोपडपट्टी धारकांनी स्वतः हटवल्या झोपड्या .....
सिटी हॉस्पिटल,कळंबोली परिसरातील यापूर्वी तोडण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या पुन्हा त्याच ठिकाणी उभारल्याचे निदर्शनास आले होते.या झोपड्यांवर तोडक कारवाई ऐवजी झोपडपट्टी धारकांना स्वतः झोपड्या हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, झोपडपट्टी धारकांनी स्वतःचे साहित्य व झोपड्या अतिक्रमित जागेवरून हटवून महापालिकेस सहकार्य केले.या कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब, अतिक्रमण विरोधी कारवाई पथक तसेच प्रभाग कर्मचारी उपस्थित होते. कोणतीही तोडक कारवाई न करता ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
Post a Comment