शनिवारी जे.एम.म्हात्रे,प्रितम म्हात्रे यांच्यासह समर्थकांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश सोहळा .... उलवे नोड येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
पनवेल- माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे व पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये शनिवारी उलवे रोड येथे जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पक्ष सोहळा कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण,राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट आशिष शेलार,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर खासदार धैर्यशील पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील,आमदार विक्रांत पाटील माजी आमदार पंडितशेठ पाटील,माजी आमदार देवेंद्र साटम,माजी आमदार सुरेश लाड,उत्तर रायगड भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित राहणार आहेत.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदान, प्लॉट नं. ६ सेक्टर १२ येथे हा पक्ष सोहळा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
Post a Comment