महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय स्पर्धा...... सर्वोत्तम महानगरपालिकांमध्ये पनवेल महानगरपालिका राज्यात तिसरी
पनवेल - महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त या गटामध्ये संपूर्ण राज्यातील सर्व महानगरपालिकांमधून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी पर्यायाने पनवेल महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सदर परीक्षेचे परीक्षण भारतीय गुणवत्ता परीक्षक या त्रस्त संस्थेमार्फत अत्यंत पारदर्शकपणे करण्यात आले होते.पनवेलकर नागरिकांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिकेने घेतलेली भरारी निश्चित अभिमानास्पद आहे.या अभिमानास्पद मिळालेल्या क्रमांकामुळे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment