News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शनिवारी आदर्श शैक्षणिक संकुलात शिक्षण परिषद; अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

शनिवारी आदर्श शैक्षणिक संकुलात शिक्षण परिषद; अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल(प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठ, आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री.बापूसाहेब डी.डी विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवीन पनवेल आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे शनिवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता 'नवीन शैक्षणिक धोरण २०२० - संधी आणि आव्हाने' या विषयांतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवद- विचुंबे येथील दादासाहेब श्री.धनराजजी विसपुते सभागृह आदर्श शैक्षणिक संकुलात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,उरणचे आमदार महेश बालदी,पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील,त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाचे विभागीय संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,कोकण विभागाचे विभागीय महासंचालक डॉ. विजय नारखेडे,ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक त्याचप्रमाणे तज्ञ मार्गदर्शक भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक डॉ. प्रशांत कोल्हे,आंतरविद्या शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर चक्रदेव उपस्थित राहणार आहेतअशी माहिती भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक व आदर्श शैक्षणिक संकुलाचे चेअरमन धनराज विसपुते, संचालिका संगिता विसपुते,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार,श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या ऍड.डॉ.सीमा कांबळे यांनी दिली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment