खारघर येथील कब्रस्तानच्या जागेचा वापर अवैधपणे मशिद व धार्मिक कार्यक्रमाकरिता ....अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ... आमदार प्रशांत ठाकूर यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई- पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची खारघर येथील नागरिकांसोबत भेट घेतली.या भेटीदरम्यान सेक्टर १४, खारघर येथील कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा वापर अवैधपणे मशिद व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच तेथे मोठ्या प्रमाणावर केलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निवेदन देत यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली.
पोलीस आयुक्तांना निवेदन देतेवेळी,आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील,युवा मोर्चा खारघर अध्यक्ष मितेश पाटील,विश्व हिंदू परिषदेच्या प्रसन्ना धर्माधिकारी,क्रिश्ना बांदेकर, हिंदू जागरण मंचचे शिवम सिंग,अॅड.गायत्री खडवडकर,आदित्य कांबळे,शैलेंद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.
Post a Comment