News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पुण्यतिथीनिमित्त स्व.जनार्दन भगत साहेबांना शेलघर येथे अभिवादन

पुण्यतिथीनिमित्त स्व.जनार्दन भगत साहेबांना शेलघर येथे अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी) - थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. ०७) स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,शकुंतला रामशेठ ठाकूर,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,भाजपचे ज्येष्ठनेते वाय.टी.देशमुख,अरुणशेठ भगत,पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी भगतसाहेंबाच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगतसाहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला.शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले.अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला.८४ गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून त्यांनी काळजी घेतली.स्वर्गीय भगतसाहेबांनी अहोरात्र सर्व समाजासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचा पुण्यतिथी कार्यक्रम शेलघर येथे संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे,माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे,माजी नगरसेविका कल्पना ठाकूर,माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील,संजय भगत,प्रकाश भगत,पांडुशेठ घरत,वसंतशेठ पाटील,पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत,गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत,न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख,जयंत भगत,विश्वनाथ कोळी,सुभाष भगत, योगिता भगत, सुहास भगत, सुधीर ठाकूर, अरुण ठाकूर, अनुप भगत, विजय भगत, समीर भगत,  रामचंद्र म्हात्रे, कृष्णा गोवंडी,संध्या मुंबईकर,निर्मला गोंधळी,हरेश म्हात्रे, कमलाकर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनीही अभिवादन केले. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment