शिवसेनेचे ज्येष्ठ,अनुभवी नेते बबन पाटील यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती
पनवेल - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबन पाटील यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे.बबन पाटील हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून,त्यांनी यापूर्वी रायगड जिल्हाप्रमुख,जिल्हा सल्लागार आणि जिल्हा संपर्कप्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.पक्षाच्या विविध आंदोलनांत आणि संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी ही पक्षाच्या कार्यपद्धतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते
मातोश्रीचे निष्ठावंत,रायगड जिल्ह्यातील एक नेतृत्व शिवसेनेचे बबन पाटील ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आठ तालुक्याचे रायगड जिल्हाप्रमुख असताना त्यांच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये व पनवेल नगर पालिकेमध्ये,तसेच उरण नगर पालिकेमध्ये जिल्यातील अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेची अनेक वेळा सत्ता आणण्याचे काम केले.रायगडमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम केले.
Post a Comment