News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेची कारवाई ....३ हजार ५०० किलो प्लास्टिक जप्त,२५ हजार दंड वसूल

पनवेल महानगरपालिकेची कारवाई ....३ हजार ५०० किलो प्लास्टिक जप्त,२५ हजार दंड वसूल

पनवेल  : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेने कारवाई करत ३ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून २५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या नियंत्रणात पनवेलच्या सर्व विभागात ही मोहीम राबविली.

पनवेल महानगरपालिका हद्दीत चारही प्रभाग समिती निहाय प्लास्टिक बंदी कारवाई करण्यात आली यामध्ये कामोठे प्रभाग समितीमध्ये प्लास्टिक जप्ती कारवाईवेळी प्रभाग क कामोठेमध्ये सुमारे 300 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.यामध्ये प्लास्टिक चमचे,ग्लास,वाट्या,प्लेट यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच यावेळी एकूण दहा हजार दंड जमा करण्यात आला.

नावडे उपविभाग

प्लास्टिक बंदी कारवाई दरम्यान नावडे उपविभागात प्लास्टिक साठा करणाऱ्या गोडाऊनवर कारवाई करून सुमारे 1 हजार 850 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

खारघर प्रभाग समिती अ ...

खारघर प्रभाग समिती अ मध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई दरम्यान प्लास्टिक 250 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी एकूण 5 हजार दंड वसूल करण्यात आला.

कळंबोली प्रभाग समिती ब ....
याबरोबरच कळंबोली प्रभाग समिती ब मध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई दरम्यान450 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी एकूण  पाच हजार दंड जमा करण्यात आला.

पनवेल प्रभाग समिती ड ....

तसेच पनवेल प्रभाग समिती ड मध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई दरम्यान  650 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच एकूण पाच हजार दंड जमा करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करून पनवेल महानगरपालिका प्लास्टिक मुक्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेस मदत करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


एकूण जप्त साठा
जप्त प्लास्टिक 3 हजार 500किलो
एकूण  25 हजार दंड जमा 

एकल प्लास्टिकचा वापर मार्च 2018 पासून प्रतिबंधित आहेत.यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) - हॅडल असलेल्या व नसलेल्या कंपोस्टेबल व प्लास्टिक ( कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन पॉलीप्रोपीलीन बॅग्स  ६० ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या यावरती बंदी  आहे.


1) प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांडया,प्लास्टिकचे झेंडे, कॅडी,कांडया, आईस्क्रीम कांडया.सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल ) यावरती बंदी करण्यातज्ञआली आहे.

 2) दुकानदारांनी कंपोस्टेबल पदार्थापासून बनविण्यात आलेले एकल वापर वस्तू उदा.स्ट्रॉ, ताट,कप्स,प्लेटस, ग्लासेस, काटे,चमचे, भांडे, वाडगा,कन्टेनर इ. तथापि, कंपोस्टेबल पदार्थापासून प्लास्टीकपासून बनविलेल्या अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment