News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेल महानगरासह तालुक्यात उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेल महानगरासह तालुक्यात उत्साहात साजरी

पनवेल, दि. १४ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेल महानगरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लोकसहभागातून ढोल-ताशा,लेझीम,चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज सकाळी साडेसात वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे,अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, सहाय्यक संचालक (नगररचना) केशव शिंदे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर,श्रीमती मंगल माळवे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे,मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, माजी महापौर डॉ.कविता चौतमोल,माजी सभागृहनेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक नितीन पाटील,जयवंत पगडे,राजू सोनी,दर्शना भोईर तसेच राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे,महेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर लेझीम,ढोल-बॅण्ड पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तीन चित्ररथ तयार करण्यात आले होते. मिरवणुकीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आला.त्यानंतर पुढील कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणि राज्यघटना जपण्यास महापालिका सज्ज आहे,याचा सर्वांना अभिमान आहे.”असे सांगून त्यांनी पनवेल महापालिका व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या मिरवणुकीचे व विविध स्पर्धांचे विशेष कौतुक केले.

यावेळी विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील,माजी आमदार बाळाराम पाटील,माजी उपमहापौर सीताताई पाटील,भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,माजी नगरसेवक,आदी मान्यवर तसेच शहर अभियंता संजय कटेकर,महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विविध संस्थांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे.या मिरवणुकीचा समारोप माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment