पनवेल शहर पोलिसांची तृतीयपंथांवर कारवाई ... पोलिसांकडे अनेक प्रकारच्या तक्रारी
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसापासून तृतीयपंथांचा पनवेल परिसरात सुळसुळाट सुरू असून त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आज तक्का परिसरात अशा प्रकारे फिरणार्या तिघा तृतीयपंथींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तृतीयपंथींच्या विरोधात जोरदार मोहिम सुरू असून शहरातील बाजारपेठा,सिग्नल,एसटी स्टॅण्ड,रेल्वेस्टेशन परिसर मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी टोळक्याने फिरत असून नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत.याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात येत आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश जास्त आहे.या तक्रारींच्या आधारे सदर कारवाई सुरू करण्यात आली असून पनवेल शहर पोलिसांनी आज तक्का परिसरात अशाच प्रकारे नागरिकांना त्रास देणार्या तिघा तृतीयपंथींना ताब्यात घेवून त्यांच्याविरोधात भादवी कलम 102,112,117 अन्वये कारवाई केली आहे.
Post a Comment