खारघर भागातील कोपरा येथील अनधिकृत आठवडा बाजारावर पनवेल महापालिकेची कारवाई
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या दिलेल्या निर्देशानुसार बुधवारी महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर प्रभागामधील सेक्टर 10 मधील कोपरा अनधिकृतआठवडा बाजारांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.
उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या सुचनेनुसार प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी सेक्टर 10 मधील कोपरा येथे अनधिकृत आठवडे बाजारासाठी आलेल्या फेरीवाले ,हातगाड्यांवर तोडक कारवाई केली व बाजार बंद करण्यात आला.
Post a Comment