News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कर्मचाऱ्याची स्वेच्छा सेवानिवृत्ती आणि वारसाला तातडीने नोकरी ....कर्तव्य,तत्परता दाखवत कर्मचाऱ्यांबाबत पनवेल महानगरपालिकेचे पाऊल

कर्मचाऱ्याची स्वेच्छा सेवानिवृत्ती आणि वारसाला तातडीने नोकरी ....कर्तव्य,तत्परता दाखवत कर्मचाऱ्यांबाबत पनवेल महानगरपालिकेचे पाऊल

पनवेल -: पुर्वाश्रमीच्या पनवेल नगरपरिषद तसेच पनवेल महानगरपालिका आस्थापनेवर सफाई कामगार या पदावर असलेल्या सुनीता पारचे यांची दिनांक १० मार्च २०२५ रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती झाली आणि तातडीने आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र,त्यांचा मुलगा विजय पारचे,यास तातडीने नोकरी देण्याचा अर्ज विचारात घेण्यात आला.त्यानुसार आज दिनांक 2 एप्रिल रोजी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते या वारसास नियुक्ती पत्र देण्यात आले.

पनवेल मनपाचा सर्वच कर्मचाऱ्यांप्रतीचा दृष्टीकोन हा सदैव मदतीचा व सहानुभूतीचा राहिलेला आहे.प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांबाबत पालिकेने कर्तव्य तत्परता दाखवत हे पाऊल उचलले असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे.

यावेळी अतिरीक्त आयुक्त सर्वश्री भारत राठोड,गणेश शेटे,उपायुक्त सर्वश्री कैलास गावडे, डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर,रविकिरण घोडके,स्वरूप खारगे,सहाय्यक संचालक केशव शिंदे ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे,शहर अभियंता संजय कटेकर,मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,सहाय्यक आयुक्त सर्वश्री, सुबोध ठाणेकर,श्रीराम पवार,डॉ.रूपाली माने,शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित हेाते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment