संस्कार भारतीच्या कोकण प्रांततर्फे पनवेलमध्ये लेखन कार्यशाळेचे आयोजन
पनवेल - संस्कार भारती कोकण प्रांतातर्फे पनवेलमध्ये नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पनवेलच्या श्री साईबाबा नारायण बाबा आश्रम मंदिर येथे होणार आहे.या कार्यशाळेचे नोंदणी शुल्क ३५० रुपये असणार आहे.
या लेखन कार्यशाळेत प्रा.प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत तसेच कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ.स्मिता दातार,प्रा.विक्रम परांजपे तर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मीनाक्षी पाटील या असणार आहेत.साहित्यिक,लेखक,नवोदित यांना या कार्यशाळेतून मार्गदर्शन आणि लेखनाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.नोंदणीसाठी संपर्क:- 9920271822
Post a Comment