पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध
पनवेल - पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
भाजपा सरकारने सन २०१४ ते आतापर्यंत केंद्रातील भाजपा सरकारने ज्या केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करून भाजपाच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे त्याचा निषेध आज पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आला तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग थांबविणेबाबत प्रांत ऑफिस कार्यालय पनवेल येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील,पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे,तालुका अध्यक्ष नंदराज मुंगजी,जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे,वैभव पाटील,जनार्दन पाटील,लतीफ शेख, नौफील सय्यद,शशिकला सिंग,कांतीभाई गंगर,सुधीर मोरे, विश्वजित पाटील,राकेश चव्हाण,आदम ढलाईत,वीर सिंग, जयवंत देशमुख,मनोज बिरादार,डॉ.स्वप्नील पवार,आरती ठाकूर,अरुण कुंभार,जोस जेम्स,नीता शेनोय व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment