News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम .... महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केली एका वर्षात केली ४१२ कोटीची वसुली

पनवेल महानगरपालिकेचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम .... महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केली एका वर्षात केली ४१२ कोटीची वसुली

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर  विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात 412 कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून वसूलीचा हा विक्रम केला आहे.मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत एकूण 412 कोटी इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. 

गेल्या महिनाभरात मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे व कर अधिक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही प्रभागामंध्ये मार्च महिना संपेपर्यंत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता शनिवार,रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवली. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरु केली.या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी 13 पथके तयार केली होती.प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात होती. 

विकास कामे करण्यासाठी महापालिकेकडे मालमत्ता कर हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याकारणाने वेळोवेळी सावध पाऊले उचलली. पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग,पनवेल औद्योगिकवसाहत,मार्बल मार्केट,जवाहर औद्योगिक वसाहत,तळोजा औद्योगिक वसाहत अशा भागांमध्ये व्यवसायिक व औद्योगिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली  आहे. शज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने सुरू करून आता अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे.परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसली.

 मार्च महिन्यात दररोज एक कोटी ते पाच कोटी मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला.दिनांक 19 मार्च रोजी महापालिकेने मागील वर्षाचा विक्रम मोडित काढत विक्रमी वसुली केली आहे.मागीलवर्षी  31 मार्च अखेर एकूण 360 कोटीचा भरणा झाला होता.हा विक्रम यावर्षी 10 दिवस आधीच मोडित काढण्यात आला.

वेळोवेळी महापालिकेने मालमत्ताधारकांच्या आक्षेप व हरकतीनुसार त्यांच्या बिलात सुधारणा करुन दिली आहे. याचबरोबर यापुढेही  मालमत्ताधारकांना त्यांच्या बिलाबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास त्यानूसार त्यांच्या बिलात सुधारणा करण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना किंवा आक्षेप असल्यास तो नोंदवावा आणि आपला मालमत्ता कर भरून पनवेलच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment