पनवेल शहरातील जुन्या असलेल्या मार्केटमधील समस्यांबाबत आयुक्त मंगेश चितळे यांना श्री गणेश भाजी व फुल व्यापारी संघाचे निवेदन
पनवेल (प्रतिनिधी)- श्री गणेश भाजी व फुल व्यापारी संघाचे संस्थापक,भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस,माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील जुने मार्केटमधील विविध समस्यांबाबत श्री गणेश भाजी व फुल व्यापारी संघाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे सल्लागार पत्रकार प्रशांत शेडगे,अध्यक्ष कमलाकर मुंडकर,उपाध्यक्ष सोमनाथ इचके,प्रमोद भुजबळ, राजेंद्र म्हसकर,शदाजी कोल्हे,बाबुशेठ कोंडीलकर,गोरख कारंडे, गणेश ताठे,प्रफुल्ल गाला,बाळू शिर्के, नरेश घुमटकर, प्रकाश कुंभार आणि इतर व्यापारी उपस्थित होते.
पनवेल येथील जुने भाजी मार्केट हे १०० वर्षाच्या आसपास स्थापन झाले आहे. या मार्केटमध्ये तीन प्रवेशदवार आहेत.या तीनही प्रवेशद्वारावर वर कमान बांधल्यास मार्केटला शोभा येईल.त्याचबरोबर या तीनही प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावे,जेणे करून चोरीचा प्रकार होणार नाही.पावसाळ्यात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो.त्याकरिता मार्केटच्या आतमध्ये पेव्हर् ब्लॉक बसवसल्यास पावसाळ्यात समस्या निर्माण होणार नाहीत तसेच सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून मार्केटमध्ये सी.सी.कॅमेरे आणि लाईट बसवल्यास ते खूप उपयुक्त ठरेल. अशी मागणी आयुक्त चितळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
Post a Comment