शुक्रवारी शरद पवार पनवेलमध्ये ...वावंजे येथील रयतच्या शैक्षणिक संकुलातील नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा ...
पनवेल - रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील वांवजे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, कै.गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स जुनिअर कॉलेज व श्री लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या संकुलातील नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जी.आर.पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,माजी आमदार बाळाराम पाटील,रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील,कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,कामगार नेते महेंद्रशेठ घरत,सचिव विकास देशमुख,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment