News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

गावाचे नाव मोठे करणारा,आनंदी स्वभावाचा महेंद्र घरत!माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरोदगार ....'यमुना स्त्री सन्मान पुरस्कार' सोहळा संपन्न!

गावाचे नाव मोठे करणारा,आनंदी स्वभावाचा महेंद्र घरत!माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरोदगार ....'यमुना स्त्री सन्मान पुरस्कार' सोहळा संपन्न!

उलवे  : महेंद्रशेठने आई-वडिलांचे कष्ट जवळून बघितलेत, त्यातूनच महेंद्रची जडणघडण झालीय.आई-वडिलांची सेवा अखेरपर्यंत करणारा महेंद्र हा जिद्दी आणि आनंदी स्वभावाचा आहे, त्याचा खडतर प्रवास मी जवळून पाहिला आहे पण जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर त्याने आपल्या शेलघर गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले.त्यामुळेच बंगल्यांचे आणि स्वच्छ, सुंदर गाव म्हणून महाराष्ट्रात शेलघर प्रसिद्ध होत आहे, असे गौरोदगार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी 'यमुना स्त्री सन्मान पुरस्कार' सोहळ्याप्रसंगी काढले. 
महेंद्र घरत हा नि:ष्पाप आहे. तो कुणाचे वाईट चिंतित नाही, तसेच महेंद्र हा बोलत नाही तर करूनच दाखवतो, असेही यावेळी रामशेठ ठाकूर अभिमानाने म्हणाले. 
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, दातृत्वाचा गुण मी आई-वडिलांकडून आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडून घेतला. म्हणूनच भुकेलेल्याला अन्न आणि गोरगरिबांना सढळहस्ते मदत मी गेली 25-30 वर्षे करतोय.आईची त्यावेळची मेहनत पाहूनच मी महिलांच्या डोक्यावरचा हंडा 25 वर्षांपूर्वी उतरवला.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांचा अकरावा स्मृतिदिन मंगळवारी (ता. ११)  भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. 
प्राची ठाकूर हिने कथ्थक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.

महेंद्रशेठ घरत आणि शुभांगी घरत, कुणाल घरत, सेजल घरत, मयुरेश चौधरी, सोनल घरत-चौधरी यांनी दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या प्रतिमेचे पूजन करून  आदरांजली वाहिली.यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.त्यात मृणाल कुलकर्णी (ज्येष्ठ अभिनेत्री),शकुंतला रामशेठ ठाकूर (सामाजिक व शैक्षणिक),प्रमदा बिडवे (एच आर मॅनेजर- सिडको), डाॅ.शीतल जोशी,डाॅ.समिधा गांधी, डाॅ.किर्ती समुद्र, डाॅ.प्रकाश निघूकर,डाॅ.जिज्ञासा कडू (वैद्यकीय),सुरेखा म्हात्रे (शैक्षणिक),अनुराधा उरसल,रिया पाटील (क्रीडा) आणि प्राची ठाकूर (कला) यांना 'यमुना स्त्री सन्मान पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.त्यांना सन्मानपत्र आणि मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले.दिवंगत यमुनाबाई घरत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्नुषा शुभांगी महेंद्र घरत यांनी यावेळी 500 महिलांना साडीवाटप केले.हा कार्यक्रम शेलघर येथील महेंद्र घरत यांच्या 'सुखकर्ता' बंगल्याच्या गार्डनवर झाला. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा पार पडला.

यमुना सामाजिक व शैक्षणिक संस्था, शेलघरच्यावतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या सचिव शुभांगी महेंद्र घरत यांच्या हस्तेही महिलांना गौरविण्यात आले.

दिबांचे पुत्र अतुल पाटील,शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन पाटील, राम म्हात्रे,वाय.टी देशमुख,राजा पडते,रघुनाथशेठ घरत, ज्येष्ठ संपादक दा.चां.कडू गुरुजी,न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील,कार्याध्यक्ष पी.के.रामण,काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, डाॅ.मनीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले, तर उत्कृष्ट सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.

सुरांच्या सुमधुर मैफलीत रसिक रंगले!
यावेळी देवकी मीडिया प्रस्तुत 'मन उधाण वाऱ्याचे' हा भक्तिमय संगीत नजराना साहिल रेळेकर यांच्या संकल्पनेने पार्श्वगायक संतोष पाटील,सारेगामा फेम मिथिला माळी, आवाज महाराष्ट्राचाची विजेती गीता पुराणिक, अल्फा मराठी सारेगमप फेम रवींद्र अहिरे यांच्या सुमधुर वाणीने रसिकांची मने जिंकली. 'ओंकार स्वरुपा...', पासून सुरांची मैफल सुरू झाली.  'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल', 'या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावे', 'एक राधा एक मिरा', 'जय देव जय देव जय शिवराया,' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताने सुरांच्या मैफलीची सांगता झाली. सुचित ठाकूर यांनी उत्कृष्ट निवेदन केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment