News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल शहर पोलिसांनी तपासाच्या आधारे १८ लाखांचे मोबाईल केले परत ....वरिष्ठांच्या हस्ते सन्मानपूर्वक मोबाईलचे वाटप

पनवेल शहर पोलिसांनी तपासाच्या आधारे १८ लाखांचे मोबाईल केले परत ....वरिष्ठांच्या हस्ते सन्मानपूर्वक मोबाईलचे वाटप

पनवेल (वार्ताहर) ः विविध राज्यातून हस्तगत केले हरविलेले 18,38, 348/- रूपये किंमतीचे एकूण 67 मोबाईल फोन नवी मुंबई आयुक्तालयाअंर्तगत सेन्ट्रल सीईआयआर पोर्टचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता आणि मोबाईल सुरक्षा वाढविण्याकरीता हा प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. त्या अनुशंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे,नवी मुंबई हद्दीतील सन 2025 माहे मार्च पर्यतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 67 मोबाईलचा उएखठ पोर्टलद्वारे पनवेल शहर पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना हस्तांतरण केलेबाबत


पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे,पोलीस उपआयुक्त परिमंडळ 02, पनवेल प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील हरविलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदविण्याकरीता नागरीकांना भारत सरकार द्वारे सीईआयआर पोर्टल सुरू करण्यात आले आहे.पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे,पोनि शाकिर पटेल, पोनि अभिजीत अभंग यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे, पोहवा यशवंत झांझम, अविनाश गंथडे,नितीन वाघमारे परेश म्हात्रे, अमोल डोईफोडे, शमहेंद्र वायकर, महेश पाटील, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, तुषार बोरसे,विनोद देशमुख, मिथुन भोसले, विशाल दुधे, किरण कराड, चंद्रशेखर चौधरी, वैभव शिंदे, प्रविण पाटील यांनी विविध राज्यातुन आतापर्यत 18,38,348/- रूपये किंमतीचे एकुण 67 मोबाईल हस्तगत केले आहेत.सदरचे हस्तगत मोबाईल फोन हे  मोबाईलचे मुळ मालक यांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांचे मोबाईल वरिष्ठांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आलेले आहे.मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरीकांनी जनमानसातील पोलीसांची प्रतिमा उंचावल्याबाबत पोलीस मानुन कौतुक केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment