रोडपाली गाव व मार्बेल मार्केटमधील अतिक्रमणांवर सिडको व पनवेल महानगरपालिकेची तोडक कारवाई
पनवेल,दि.05: पनवेल महापालिकेच्या सहकार्यातून आज सिडकोच्या माध्यमातून रोडपाली गाव व मार्बेल मार्केटमध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात आली.यावेळी रोडपाली गावातील डीडीचा ढाबा व मार्बल मार्केट येथील अतिक्रमणांवर सिडको प्राधिकरण व पनवेल महानगरपालिका द्वारे संयुक्त कारवाई करून तोडक कारवाई करण्यात आली.
यावेळी सिडको अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागातर्फे लक्ष्मीकांत डावरे व सिडको अतिक्रमण पथक कर्मचारी महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त ,सहाय्यक आयुक्त, प्रभाग ब प्रभारी अधिक्षक ,प्रभाग समिती ब स्टाफ व अतिक्रमण पथक तसेच उपस्थित होते.
या अतिक्रमण कारवाईमध्ये रोडपाली गावातील डीडीचा ढाबा मार्बल मार्केटमधील अनधिकृत व्यवसाय करणारे आठ शेड, अनधिकृत 10-15 झोपड्या यावरती निष्कासन कारवाई करण्यात आली. दोन जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईवेळी सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment