कोमसाप नवीन पनवेल शाखेतर्फे पोपटी कवी संमेलनाचे आयोजन ... शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.६ वाजता,भगतवाडी सुकापूर पनवेल
पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सुकापूरच्या भगतवाडी,पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कवी संमेलनासाठी कवी,साहित्यिक,लेखक यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन संयोजक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, समाजसेवक विलास भगत यांनी केले आहे.पोपटी कवी संमेलन हा एक साहित्यिक उपक्रम असून गेली २१ वर्षे पनवेल आणि परिसरातील शेतमळ्यात त्याचे रायगडभूषण, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.
Post a Comment