News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल लायन्स आणि डॉ.पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या डायलिसिस सेंटरला ला.संजय पोतदार यांचे मोठे योगदान

पनवेल लायन्स आणि डॉ.पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या डायलिसिस सेंटरला ला.संजय पोतदार यांचे मोठे योगदान

पनवेल - लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि डॉ.पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या माध्यमातून नुकतेच डायलिसिस सेंटरचे उद्‌घाटन प्रांतपाल एन.आर.परमेश्वरन आणि जेष्ठ लायन संजय पोतदार यांचे हस्ते करण्यात आले.लायन संजय पोतदार यांनी पनवेल लायन्स क्लबला दिलेल्या भरघोस देणगीतून हा उपक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी उपस्थित प्रांतपाल एन. आर. परमेश्वरन यांनी या उपक्रमाबद्दल पनवेल लायन्स क्लबचे कौतुक केले आणि या माध्यमातून पनवेल परिसरातील गरजू रुग्णांना फायदा होईल असे सांगितले.ज्येष्ठ लायन संजय पोतदार यांनी सांगितले की,पनवेल लायन्स क्लब गेली अनेक वर्षे पनवेल परिसरात विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन कार्यरत आहे आणि पनवेल क्लबचा काही तरी स्थायी स्वरूपाचा उपक्रम असावा हे स्वप्न आज या डायलिसिस सेंटरद्वारे पूर्ण होत आहे. या सेंटरमध्ये रुग्णांना माफक दरात सेवा दिली जाईल.
यावेळी डॉ.कीर्ती समुद्र यांनी, पनवेल लायन्स क्लबमुळेच आज हे डायलिसिस सेंटर नवीन स्वरूपात सुरू होत आहे असे प्रतिपादन केले आणि भविष्यात सुद्धा लायन्सचे सहकार्य असेच मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी मल्टिपल काऊन्सिल चेअरमन ए.के.शर्मा, प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक, जी एस टी चेअरमन विजय गणात्रा रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे पदाधिकारी आणि लायन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पनवेल लायन्स क्लबचे अध्यक्ष एस.जी.चव्हाण, सचिव अशोक गिल्डा यांनी खूप परिश्रम घेतले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment