पी.जे.बी.नॅशनल पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न... पौराणिक,ऐतिहासिक गाण्यांवर विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
पनवेल - प्रतीक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पी.जे.बी. नॅशनल पब्लिक स्कूल पळस्पे येथे ३ री ते ८ वीच्या वर्गांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले.या कार्यक्रमाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व मुंबई हायकोर्टच्या वकील रिंपल त्रिवेदी ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
त्याप्रसंगी स्कूलचे चेअरमन डॉ.जयंत भोईर ,सौ.प्रार्थना भोईर,श्री मदन कोळी (माजी नगराध्यक्ष),सौ प्रमिला त्रिवेदी,सौ व श्री कमलेश अग्रवाल,सौ व श्री संजय पाटील,सौ व श्री दीपक पाटील,सौ.व श्री सिद्धेश पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राजेश्री जगदाळे,शिक्षक वर्ग,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.छत्रपती संभाजी महाराज,महाभारत अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु.सानिका पाटील व कु.अंजली कदम यांनी केले.
Post a Comment