News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियसीची केली प्रियकराने हत्या ...‌ नवीन पनवेलमधील घटना ... प्रेमसंबंध,वारंवार वाद ...संशय आणि हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियसीची केली प्रियकराने हत्या ...‌ नवीन पनवेलमधील घटना ... प्रेमसंबंध,वारंवार वाद ...संशय आणि हत्या

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः प्रियसीचे दुसर्‍यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 22 वर्षीय प्रियसीवर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेल सेक्टर 18 मध्ये घडल्याचे समोर आली आहे. प्रियसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर वार करून स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे.याप्रकरणी खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात आरोपी प्रियकराविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,जागृती सत्वे (वय 22) राहणार नवीन पनवेल,सेक्टर 18 असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.जागृती ही तिच्या कुटुंबासोबत नवीन पनवेल सेक्टर 18 येथे राहत होती.जागृती हिचे निलेश शिंदे (वय 25) राहणार देवगाव ठाणा याच्यासोबत प्रेमसंबंध होते.गेल्या तीन महिन्यापूर्वी दोघांच्या प्रेमसबधात तणाव निर्माण झाला होता.त्यांचा ब्रेकअप देखील झाला होता.मात्र यानंतर देखील दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते.आपल्या प्रियसीचे दुसर्‍या मुलासोबत प्रेमसबध असल्याचा संशय निलेश याच्या डोक्यात वारंवार येत होता. या गोष्टीचा राग मनात धरून निलेशने 31 जानेवारी रोजी प्रियसीचे घर गाठले आणि जागृतीला शिवीगाळ करत तू दुसर्‍यासोबत प्रेमसबध ठेवू नको असे बोलून तिला मारहाण केली.त्यानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जावून जागृतीला मारहाण करत तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिला ठार केले. त्यनंतर निलेशने स्वतःला देखील संपवण्यासाठी स्वतःवर देखील वार केले.यावेळी जागृतीची आई आणि बहीण ही घरी होती.अतिरक्तस्राव झाल्याने जागृती जागेवर मृत पावली आणि निलेशला उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.या प्रकरणी खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment