पनवेलच्या द्वारकादास शामकुमार यांच्यावतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी - पनवेलच्या द्वारकादास शामकुमार यांच्यावतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ८ या कालावधीत आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील द्वारकादास शामकुमार या साड्यांच्या शोरूममध्ये महिलांसाठी एक खास हळदी-कुंकू समारभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभात महिलांना एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देण्याची,आनंद साजरा करण्याची आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्याची संधी मिळेल,हा कार्यक्रम महिलांना एकत्र येऊन आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात आपसात मैत्री दृढ करण्याचा आणि एकमेकांच्या जीवनात सकारात्मकता आणण्याची संधी देईल,असा विश्वास संयाेजकांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment