News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक विरोधी कारवाई ...१६ दिवसात ४७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, ८० हजाराचा दंड वसूल

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक विरोधी कारवाई ...१६ दिवसात ४७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, ८० हजाराचा दंड वसूल

पनवेल,दि.16 : गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेचे  आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पनवेल,खारघर,कळंबोली,कामोठा या चार प्रभागांमध्ये  प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे.यामध्ये मागील 16 दिवसात सुमारे 47 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच सुमारे 80 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज  दिनांक 16 जानेवारी रोजी मोठी प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती 'ब '  कळंबोली प्रभागामध्ये प्लास्टिक पिशवी  प्रतिबंध (सिंगल युझ प्लास्टिक)  कारवाई दरम्यान रुपये 10 हजार हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला , या कारवाई मध्ये सुमारे 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.

याचबरोबर मागील पंधरा दिवसांमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग अ,  प्रभाग ब ,प्रभाग क, प्रभाग डमध्ये सातत्याने प्लास्टिक विरोधोत कारवाई केली जात असून यावेळी सुमारे  38 किलोपेक्षा अधिक सिंगल युज प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात  एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे. 

याचबरोबर चारही प्रभागांमधील दुकानदारांना दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाचे पालन न करणाऱ्या दुकानादारांवरती देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त स्मिता काळे व विभाग प्रमुख अनिल कोकरे यांच्या पर्यवेक्षणाखाली चारही प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई तसेच दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.तसेच सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4(2) अन्वयानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचे उत्पादन,आयात, साठवण,वितरण विक्री आणि वापरांवर बंदी करण्यात आली आहे.  
प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर १० हजार रुपये ,तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर २५ हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment