लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला माघारी फिरावे लागले
पनवेल - लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला नरमाई पत्करत माघारी फिरावे लागले.
उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाईचा बडगा उचलण्यासाठी गव्हाण गावात पोहचले होते.याची माहिती प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मिळताच त्यांनी आपली स्वतःची कामे बाजूला ठेऊन ते शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत गव्हाण गावात पोहचले आणि सिडकोने सुरू केलेली तोडक कारवाई थांबवली.गव्हाण ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सदस्य हेमंत पाटील, महेश पाटील,सचिन कोळी यांनी केलेल्या बांधकामवर कारवाई करण्यासाठी आले होते.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना नमते घेत कारवाई थांबवावी लागली. सिडको जो पर्यत्त तोडक कारवाई थांबवत नाही तो पर्यत्त आम्ही इथून हलणार नाही असा इशारा यावेळी लोकेनते रामशेठ ठाकूर यांनी दिला.
यानंतर भाजपच्या गव्हाण येथील कर्यालयात सिडको अधिकारी आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये येत्या २ ते ३ दिवसात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या सोबत सिडको अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या प्रश्नासदर्भात बैठकीचे आयोजन केले जाईल तोपर्यत्त कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई सिडकोने करु नये असा निर्णय झाला असल्याची माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रसारमाध्यामांना दिली. या बैठकीत झालेल्या निर्णयाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठनेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उरण तालुका अध्यक्ष रविंद्र भोईर, शेकापचे प्रितम म्हात्रे,उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा,हेमंत ठाकूर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भुपेंद्र पाटील, अमर म्हात्रे,माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, जयवंत देशमुख,वसंत म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की,सिडको अधिकाऱ्यांचा कारभार हा भोंगळ असल्याच शिक्का प्रकल्पग्रस्तांनी ठेवला आहे.शासनाने विविध वेळा प्रकल्पग्रस्तांना अश्वासणे दिली, २५० मिटर पर्यत्तची घरे नियमीत करणार मात्र अजूनही सिडकोचे अधिकारी हे तोडक कारवाया करतच आहेत.मी अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमीत करण्यासाठी पाठपुरावा करत असून सिडकोला सतत सांगत आलोय की तुम्ही गावाच्या भोवती रिंग रोड बनवला पाहिजे. पण या कामात सिडकोने सतत चालढकलपणा केल्यामुळे आज ही वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली आहे अस मत व्यक्त करताना सिडकोच्या कारभारावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.
Post a Comment