लायन्स सरगमतर्फे आंतर शालेय कराओके गायन स्पर्धा
पनवेल - लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10 वाजता आंतर शालेय कराओके गायन स्पर्धा बांठीया विद्यालय,नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.सदर स्पर्धा इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10वी अशा 2 गटात होणार आहेत.स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.200/- असून प्रत्येक स्पर्धकाला मराठी किंवा हिंदी गाण्यांचा 1 मुखडा आणि अंतरा सादर करायचा आहे. विजेत्यांना रोख बक्षीस आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल तसेच प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या गाण्याचा ट्रॅक मोबाईलमध्ये आणायचा आहे.नाव नोंदणीची अंतिम तारीख 3 जानेवारी असून नाव नोंदणीसाठी मो.क्र. 9819654419 किंवा 9820974715 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन अध्यक्षा मानदा पंडित यांनी केले आहे.
Post a Comment