वडघर येथे शेजाऱ्याने खोदलेल्या सांडपाण्याच्या खड्ड्यामुळे आरोग्यास धोका ...कडक कारवाई करण्याची अजय बाबरे यांची प्रशासनाकडे मागणी
पनवेल- पनवेल महानगराला लागूनच असलेल्या वडघर येथे शेजाऱ्याने खोदलेल्या सांडपाण्याच्या खड्ड्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून या विरोधात
कडक कारवाई करण्याची मागणी अजय बाबरे यांनी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,पनवेल शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे वडघर ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे.
अजय बाबरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत,मी वडघर रमाबाई नगर येथे राहत असून माझ्या घराकडील उजव्या बाजूस मनोज पाटील याने ड्रेनेज लाईन ( टाकी ) बांधण्यास घेतली आहे,या ठिकाणी सांडपाण्याचा खड्डा खोदण्यात आला आहे. खोदलेल्या खड्ड्यालगतच घरांची वस्ती आहे,या सांडपाण्याच्या खड्ड्याविषयी मनोज पाटील यांच्याशी बोललो असता सांडपाण्याचा खड्डा बुजवणार नाही,अशी भाषा केली.या सांडपाण्याच्या खड्ड्यामुळे डेंगूचे मच्छर झाले आहेत.सांडपाण्याच्या टाकीचा वासही येत आहे,गटाराचे पाणी जाण्यास त्यामुळे जागा उरली नाही.यामुळे प्रशासनाने आजूबाजूच्या घरांना न्याय द्यावा अशी विनंती अजय बाबरे यांनी प्रशासनाकडे केली आहे या निवेदनावर शेजाऱ्यांनी ही सह्या केल्या आहेत.
Post a Comment