पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आदई सर्कलवरील अनधिकृत व्यावसायिकांवरती धडक कारवाई
पनवेल,दि.20:- पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आदई सर्कल येथे अनधिकृत रित्या व्यवसाय करणारे मच्छी विक्रेते, मटनवाले, नर्सरी, युवा कार्यालयांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने जेसीबीच्यया साहाय्याने धडक कारवाई करून,सर्व टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे, प्रभारी अधिक्षक अरविंद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी अरूण कांबळे, खांदेश्वर पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी, महापालिका सफाई कर्मचारी, वाहतुक पोलिस , एनएसएफ जवान असा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेने कार्यक्षेत्रात अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, आज आदई सर्कलवर अतिक्रमण विभागाच्यावतीने अनधिकृत मच्छी विक्रेते, मटनवाले, नर्सरी, युवा कार्यालयांवर जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले.
त्याचप्रमाणे खांदेश्वर स्टेशन परिसरामध्ये अनधिकृतरित्या भाजी व्यवसायिकांवरती अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कार्यवाही करण्यात आली. कामोठ्यामध्ये विनापरवानगी लावलेल्या बॅनर्सवरती कारवाई करण्यात आली. तसेच तळोजा फेज 2 येथील आठवडे बाजार बंद करण्यात आला.
तसेच पनवेलमध्ये लाईन आळी , मालधक्का रोड, पटेल रुग्णालय,कापड गल्ली येथील दुकानाबाहेर अनधिकृत ठेवलेल्या सामानांवर अतिक्रमण कारवाई करून नऊ पुतळे, कपडे, नारळ हार इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. नवीन पनवेल येथील फुटपाथवरील अनधिकृत ताडपत्री शेड काढण्यात आले.
Post a Comment