News Breaking
Live
wb_sunny Jul, 22 2025

Breaking News

मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण ...महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नांना यश !

मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण ...महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नांना यश !

पनवेल- सिडकोने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत.याकरता झुंजार कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडकोने मोरवे गावाकरता अधिकृत मैदान मंजूर करून देत माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते या मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रम  मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मोरावे ग्रामस्थांच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फित कापून तसेच श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले तर कामगार नेते श्री महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करून श्रीफळ वाढवून बॅटिंग केली.स्वर्गीय दि.बा.पाटील तसेच जनार्दन भगत साहेब यांनी या भागाला मोठा इतिहास दिलेला आहे.1984 च्या आंदोलनातील काही किस्से सांगत कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे, आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे,या मैदाना करता मोराव्यातील ग्रामस्थांनी चिकाटी सोडली नाही त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तम कोळी श्रीकांत म्हात्रे,लहू म्हात्रे, मदन पाटील, निलेश खारकर,धावजी पाटील,विनायक पाटील,चंद्रकांत म्हात्रे,सचिन म्हात्रे,मयूर म्हात्रे,यज्ञेश भोईर,प्रणय कोळी,संजय पाटील,अमर म्हात्रे ,काशिनाथ म्हात्रे,मिलिंद म्हात्रे, चिंतामण गोंधळी,रुपेश ठाकूर,उमेश ठाकूर,संकेत भोईर त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते .

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment