नवीन पनवेलच्या फडके विद्यालयात बालदिन उत्सव साजरा ... विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,परिसरातील आश्रमातील मुलांसाठी खाऊचे पैसे जमा केले आणि त्यांना भेट देण्याचा निर्धार केला
पनवेल – नवीन पनवेल येथील फडके विद्यालयात बालदिनाचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यामध्ये ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक आणि शैक्षणिक खेळांमध्ये सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या वयानुरूप विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.नेहरू यांच्या जीवनावरील महत्त्वाची माहिती सांगण्यात आली.त्यांचे बालकांवरील प्रेम आणि शिक्षणाबद्दलच्या दृष्टीकोन यावरही भर देऊन भारताच्या नवीन पिढीला जागरूक करण्यात आले.
या उत्सवाच्या निमित्ताने,विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,परिसरातील आश्रमातील मुलांसाठी खाऊचे पैसे जमा केले आणि त्यांना भेट देण्याचा निर्धार केला.या कार्यक्रमामुळे
विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती एकता, सहकार्याची भावना यांचे महत्व अधोरेखित झाले.
या उत्सवाच्या माध्यमातून फडके विद्यालयाने आपल्या परंपरेलानुसारून नवीन पिढीमध्ये केवळ आनंदच नाही, तर सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची भावना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शीतल साळुंखे यांनी व्यक्त केली.
Post a Comment