दहा वर्षीय अंश फडकेचा प्रामाणिकपणा ...करंजाडे येथील महायुती उमेदवाराच्या प्रचार सभेत सापडलेले ३ तोळे सोन्याचे ब्रेसलेट,मालकाकडे केले सुपूर्द
पनवेल: (साहिल रेळेकर)- करंजाडे येथील राजकीय प्रचार सभेदरम्यान सापडलेले तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट दहा वर्षीय अंश फडकेने प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे सुपूर्द केले.अंशच्या या प्रामाणिकपणाबद्दल केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे,आ.महेश बालदी,करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक करून पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.
करंजाडे येथे उरण विधानसभा भाजप महायुतीचे उमेदवार आ.महेश बालदी यांची शुक्रवारी (दि. १५ नोव्हेंबर) जाहीर सभा संपन्न झाली.या सभेत पळस्पे येथील एका व्यक्तीचे तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते.दरम्यान करंजाडे येथील रहिवाशी अंश फडके हा त्याची आई ग्रामपंचायत सदस्य प्रिया फडके यांच्यासमवेत प्रचारसभेला आला होता.दरम्यान अंशला तेथील मैदानावर सोन्याचे ब्रेसलेट सापडले.त्यानंतर अंशने तात्काळ व्यासपीठावर जाऊन निवेदकाकडे ब्रेसलेट सुपूर्त केले व सदर सोन्याची वस्तू आपल्याला मैदानावर सापडल्याचे सांगितले.त्यानंतर सदर सोन्याचे ब्रेसलेट त्याच्या मूळ मालकाकडे सुपूर्त करण्यात आले. अंश फडकेच्या प्रामाणिकपणाबद्दल उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.
Post a Comment