कामोठे येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपात ...... माजी खासदार,लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन केले स्वागत
पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला,त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आणि भाजप परिवारामध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कामोठेमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पनवेल जिल्हा पदवीधर मतदारसंघाचे सचिव तुषार सांळुंखे यांच्यासह सनी वगाडे,किरण भगत,राजाराम वनकर,हरिश्चंद्र घाग,अमित सोनावणे,सचिन पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठनेते वाय.टी.देशमुख,कामोठे मंडळ अध्यक्ष रविंद्र जोशी,माजी नगरसेवक गोपीनाथ भगत,युवानेते हॅप्पी सिंग,समाजसेवक प्रदीप भगत,युवा नेते हर्षवर्धन पाटील,हरजींदर कौर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment