पनवेल विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय,पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्यासाठी मतदार बंधू भगिनींच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने पद्मशाली समाज कामोठे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.या संदर्भात समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या पाठिंबा पत्रात, पनवेल विधानसभा महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाज कामोठेचा जाहीर पाठींबा देत असून आमचा संपूर्ण समाज विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही,असे नमूद करून समाज १०० टक्के आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची ग्वाहीही दिली आहे.
Post a Comment