News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य .... पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य .... पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार

मुंबई, दि. ९ :-  विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

        भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहेते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीतअशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड,मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुककामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)पॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्डपारपत्र (पासपोर्ट)निवृत्तीवेतनाची दस्तावेजकेंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्रसंसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

 एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेलपण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्रयादी भाग क्रमांकमतदानाची तारीखवेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती - चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment