News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भाजप महायुती सर्वसामान्य नागरिकांचे सरकार - आमदार प्रशांत ठाकूर ...नवीन पनवेल पनवेलच्या प्रभाग १६ मधून प्रचाराचा नारळ फोडला

भाजप महायुती सर्वसामान्य नागरिकांचे सरकार - आमदार प्रशांत ठाकूर ...नवीन पनवेल पनवेलच्या प्रभाग १६ मधून प्रचाराचा नारळ फोडला

पनवेल (प्रतिनिधी) - सर्वसामान्य नागरीकांच्या समस्यांवर फक्त भाजप महायुती सरकार काम करु शकते. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यत्त पोहचून त्यांना आपण केलेल्या विकासकामांची माहिती द्या आणि त्याचबरोबरीने त्यांच्या सुचनाही समजून घ्या,असे आवाहन भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय,पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये प्रचार सभेवेळी केले तसेच आजपासून मोठ्या विजयाच्या दिशेने आपला प्रवास सुरु झाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
तत्पुर्वी प्रभाग पनवेल विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा आमदार विजयी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज झाले आहे, त्यांनी सोमवारी सकाळी अर्ज दाखल करून आपल्या विजयाचा शंखनाद केला.त्यानंतर नवीन पनवेल पनवेल मधील प्रभाग १६ मधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.यावेळी त्यांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यत्त पोहचून ज्या पद्धतीने तुम्ही साथ दिली ती यापुढेही द्या आणि या पुढेही पनवेल मतदारसंघाचा अधिक विकास करण्याची संधी द्या असे आवाहन मतदारांना केले. त्यांच्या या प्रचार रॅलीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला तसेच मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करुन त्यांना विजयाचा आर्शिवाद देण्यात आला.दरम्यान या प्रचार रॅलीची सांगता सेक्टर ३ येथे झाली.यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी,आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयामध्ये प्रभाग १६ कुढेही कमी पडणार नाही,अशी ग्वाही दिली. 

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस नितीन पाटील,पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत,पनवेल महापालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल,माजी सभागृहनेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक समीर ठाकूर,अजय बहिरा,महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर,शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मंदा जंगले,भाजपनेते महेंद्र वावेकर,आरपीआयचे पनवेल अध्यक्ष प्रभाकर कांबळे,अमरीश मोकल, प्रभाग अध्यक्ष शिवाजी भगत, किशोर चौतमोल,अक्षय सिंग,देवराम शार्दुल,मयुर आंग्रे, विवेक होन,माया देवजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment