पनवेल तालुक्यातील कलावंतीण दुर्ग येथे ट्रॅकींगसाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील कलावंतीण दुर्ग येथे आपल्या मित्रांसह ट्रॅकींगसाठी गेलेल्या एका इसमाच्या छातीत दुखू लागल्याने तसेच चक्कर येवून बेशुद्ध झाल्याने त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आनंद शहापूरकर (47 रा.पुणे) हा आपल्या काही सहकार्यांसह पनवेल जवळील कलावंतीण दुर्ग येथे ट्रेकींग करण्याकरिता गेला असताना त्याला अचानकपणे छातीत दुखू लागल्याने तसेच चक्कर येवून बेशुद्ध झाल्याने त्याला त्याच्या सहकार्याने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment