शनिवारी पनवेलमध्ये युवा निर्धार मेळावा ...भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) - भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्यावतीने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६ वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आपला देश युवकांचा म्हणून जगात ओळखला जातो.त्याच अनुषंगाने युवकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांचे सर्व स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने काम करत असते. या युवा मोर्चाच्यावतीने शहरातील मार्केट यार्ड येथे युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यास युवकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment