पनवेलमध्ये धर्मवीर २' चे लॉन्चिंग आणि फ्री प्रीमियर शो ....मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून दिल्या शुभेच्छा ...कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद
पनवेल- पनवेलमध्ये धर्मवीर २' चे लॉन्चिंग आणि फ्री प्रीमियर शो शिवसेना महानगरप्रमुख ॲड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.या शोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
पनवेलमध्ये आयोजित केलेल्या 'धर्मवीर २' च्या लॉन्चिंग आणि फ्री प्रीमियर साठी हजारो पनवेलकरांनी गर्दी केली ओरिजन मॉलमध्ये भव्य दिव्य सोहळ्याचा आयोजन केले गेले.खरंतर पूर्वीच्या कार्यक्रमानुसार रोहा येथील कार्यक्रम आटोपून या लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते परंतु जिल्ह्यातील हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर पाटण (सातारा) येथे कार्यक्रमास गेले.
परंतु मी माझे सर्व सहकारी साहेबांच्या न येण्याने थोडे हिरमुसलो पण आमचा नेता हा "जगात भारी" आहे याची प्रचिती आली. ६.३० वाजता लॉन्चिंग होणार होतं , आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना प्रभाकर काळे यांचा फोन आला आणि "शिंदे साहेब तुला व्हिडिओ कॉल करत आहेत फोन उचल" असा निरोप दिला.पाटणवरून हेलिकॉप्टरने पुणे येथे येऊन पुणे एअरपोर्ट येथे विमानात बसून मुंबईकडे निघण्याच्यापूर्वी त्यांनी साडेसहाची वेळ गाठली आणि मला माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितलं "कशी तयारी केलीस ते दाखव... साहेबांनी सर्व तयारी बघितली.मेहनत,सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केलं आणि त्यानंतर माझा फोन मी माईक जवळ नेला असता मॉलमध्ये चित्रपट बघण्यासाठी जमलेल्या हजारो पनवेलकरांशी त्याने थेट संवाद देखील साधला.
काय म्हणावे ह्याला... त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या नेत्याने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची दखल घेत प्रत्यक्ष आले नाही पण 'व्हर्चुअली' कार्यक्रमात उपस्थित राहून आपला शब्द पाळला आणि आमचा आनंद- उत्साह द्विगुणीतच नव्हे तर शतगुणित केला...याबद्दल साहेब तुमचा मी आभारी आहे.नेता असावा तर असा....!
-- ॲड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण
शिवसेना महानगरप्रमुख
मा.नगरसेवक,पनवेल
Post a Comment