News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सिलेंडरच्या स्फोटाने घराचे मोठे नुकसान ... कळंबोलीतील घटना

सिलेंडरच्या स्फोटाने घराचे मोठे नुकसान ... कळंबोलीतील घटना

पनवेल (वार्ताहर) ः कळंबोली गावातील एका रहिवाशी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) घडली आहे.या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.
येथील गणेश सृष्टी रहिवाशी संस्थेतील 6 मजल्यावर असलेल्या सी 601 क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे तीन सिलेंडर ठेवण्यात आले होते.यापैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून,सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटर अंतरापर्यत ऐकू गेला आहे.स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील या घराची बाहेरील भिंत पूर्ण पणे तुटली असून, तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे यामुळे नुकसान झाले आहे. तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडेदेखील इमारती खाली विखूरले आहेत.महत्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती मिळाली नसून, घटनेनंतर घटनास्थळी पोहचलेले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी स्फोट कशामुळे घडला याचा तपास करत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment