पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः एसटीमधून डिझेलची चोरी केल्याप्रकरणी तीन अनोळखी इसमाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.उदय मोरेश्वर जोशी हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चालक म्हणून नोकरी करतात.गुहागर ते मुंबई बस क्रमांक एम एच 20 बी एल 1568 ही गौरी गणपती ज्यादा वाहन असे कर्तव्य नेमले असता त्यांच्यासोबत दिलीप रिंडे व शिवानंद घुगे यांची नेमणूक करण्यात आली.ते फ्रेश होण्यासाठी त्यांनी खारघर टोलनाका येथे पहाटे साडेतीन वाजता गाडी थांबवली व ते गाडीतून खाली उतरले.ते गाडीपासून काही अंतरावर बोलत थांबले असताना पांढर्या रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा गाडीत दोन ते तीन इसम अंगात शर्ट न घातलेले उघड्या अवस्थेत खाली उतरले आणि डिझेल गाडीतून डिझेल चोरी करत होते.ते डिझेल चोरी करत असताना आरडाओरडा करण्यात आला.यावेळी ते त्यांचे एर्टिगा कार भरधाव वेगाने घेऊन पळून गेले.दरम्यान त्यांनी 140 लिटर डिझेलची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment